प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर अली शेख :
पिंपरी चिंचवड़ दि १० बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता. बोपखेल गावासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत मुळा नदीवरील पुल ते खडकीतून जाणारा एलफिस्टन रस्ता ते टॅंक रस्ता पक्क्या स्वरूपात करण्याच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले. 24 जून 2016 रोजी महापालिकेमार्फत संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्याकडे बोपखेल वासियांसाठी मुळा नदीवर पुल व पक्का रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.
महापालिकेने वेगात काम सुरू केले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक होती. अखेर संरक्षण विभागाकडून कामाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेवरील पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.