निर्भया सारख्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का ?.. रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला संताप



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़ दि ११  सप्तेंबर देशात आणि राज्यात अत्यंत भयंकर  लज्जापद घटना घड़त आहे दिल्ली येथे साबिया प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई येथे साकी नाक्यावर घडलेली घटना ही मनुस्कीला  काळीमा फासणारी व लाजवनारी अशी घटना आहे.



 अगदी तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे. निर्भया घडल्या नंतरच चर्चा करणार आहोत का? घटना घडल्यानंतर आपण चार दिवस चर्चा करतो आणि नंतर गप्प बसतो. समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसावी, कायद्याचे राज्य असले तरी माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्त्र श्वापादांचा नायनाट व्हावा यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने एकत्र यावे. कालची घटना अमानवी आहे. आरोपींना शिक्षा होईल. पण तरीही या घटना थांबणार आहेत का ? वाढती विकृती आपण थांबवणार आहोत की नाही ?, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला. वाढती पोर्नोग्राफी थांबवण्यासाठी आमच्या खासदाराने केंद्र सरकारला पत्रं लिहिलं असून त्यावर कार्यवाही होण्याची अपेक्षाही चाकणकर यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post