बेकायदेशीरपणे प्लास्टिकचा वापर करणा-यांविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईची मोहिम सुरु



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड शहरात  प्लास्टिक पिशवी (कैरी बैग )वापरने बंधनकारक आसतानाही  त्याचा वापर छुप्या मार्गाने केला जात आहे.बाजार पेठेत प्लास्टिक पिशवी चा वापर नेहमीच पाहण्यात येत आहे,प्रशाशनाचा  कुठालाही धाक राहीलेला दिसत नाही, म्हणून बेकायदेशीरपणे प्लास्टिकचा वापर करणा-यांविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईची मोहिम सुरु केली आहे.

या कारवाई मोहिमेअंतर्गत आज शुक्रवारी, दि. २४ रोजी  क प्रभागामध्ये प्लास्टिक बंदी व नॉन कंपोस्टिंग साठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आलेली आहे, तर या कारवाई मोहिमेत प्लास्टिक बंदीसाठी 10 हजार रुपये व नॉन कंपोस्टिंगसाठी पाच हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय दवाले, शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कंचनगौडा यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post