प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ : शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व कामगार नेते अमोल कलाटे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी काही कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे आज, बुधवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरामध्ये शिवसेनेला पहिला धक्का बुधवारी बसला या वेळी गजानन चिंचवडे यांनी चापेकर बंधू स्मारकाची प्रतिकृती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते.