प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़,दि ५ सप्तेंबर देहूरोड बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला अगोदर लसीकरण करा अशी मागनी देहूरोड महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना अध्यक्ष मलीक शेख यांनी देहूरोड कैंटोमैंट बोर्डला पत्रकाद्वारे केली आहे, मलिक शेख यांनी पत्रात नमूद केलेल्या बाबी खालील प्रमाणे,
गेली आठ दिवस आमची एक टीम देहूरोड बाजारात साध्य पद्धतीने व्यापारी धारकाची विचारपूस केली असता आमच्या नजरेत 80%व्यापारी व कर्मचारी लसीकरण न घेता व्यवसाय मोठया प्रमाणात चालू आहे. त्या मध्ये नास्ता व्यावसायिक, हातगाडी, हॉटेल, भाजीपाला, बार, मटण ,व्यावसायिक कर्मचारी आचारी ह्याचा समावेश आहे,त्या मुळे देहूरोड शहरात प्रत्येक नागरिक खरेदी साठी येतात त्यामुळे तिसरी लाट सुध्दा लोकडोन होऊ नये म्हूणन आपणांस विनंती आहे जो पर्यन्त व्यापारी हॉटेल चालक मालक कामगार ह्यांना किमान एक डोस तरी घेणे बंधनकारक करावे अन्यथा त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आपणांस आज रोजी पत्राद्वारे करीत आहे.
आपला कृपाभिलाशी
मलिक शेख महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना
देहूरोड शहर अध्यक्ष