क्राईम न्यूज : अज्ञात व्यक्ति कडून तरुणाचा खून , घटना डांगे चौक परिसरात वाकड येथे घडली.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़ : अज्ञात व्यक्ति ने एका तरुणाच्या डोक्यावर कठीण सलाई  मारून डोके फोडून तरुणाचा खून केल्याची  धक्कादायक   घटना डांगे चौक परिसरात वाकड येथे घडली आहे , ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.

रोहन दिलीप कांबळे वय 30, रा. चांदणी चौक, धायरीगाव, पुणेअसे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप शंकर कांबळे वय 60, रा. चांदणी चौक, धायरीगाव, पुणे, यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत रोहन कांबळे जा व्यक्ती  डांगे चौकाजवळ असलेल्या एका दारूच्या दुकानात दारू प्रशासन करून बाहेर आल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या डोक्यात तीथे अलेल्या एका अज्ञात इसमाने लोखंडी रॉड  सारख्या हत्यारने मारुन पसार झाला ,त्यामध्ये रोहन यांच्या डोक्याची कवटी फुटली  तो जाग्यावरच कोसळला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर रोहन यांना  जख्मी अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास वाकड पोलीस  करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post