प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड़ : दिवसा पहानी कुलूपबंद आहे खात्री करून रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आह, टोळीत दोन सख्ख्या भावांचा समावेश. टोळीचे चार आरोपी फरार आहेत. या आरोपींकडून दागिने घेणाऱ्या एका सोनाराला अटक करण्यात आलेली आहे. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल, गॅस सिलेंडर, होमथिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 18 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साहील रमेश नानावत ऊर्फ अल्लु अर्जुन वय 25, रा. मु. पाथरगाव, पो. कामशेत ता. मावळ जि. पुणे, देवदास ऊर्फ दास रमेश नानावत वय 23, रा. मु. पाथरगाव, पो. कामशेत ता. मावळ जि. पुणे, योगेश नुर सिंह वय 34, रा. एस.टी. स्टॅड जवळ, ता. पौंड, जि. पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. त्यामध्ये सहा जणांची एक टोळी घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील दोन चोरटे सख्खे भाऊ असून ते दौंड तालुक्यातील भांडगाव येथे त्यांच्या नातेवाईकाच्या घरी लपून बसलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले.