प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी : पिंपरी चिंचवड मध्ये धडाकेबाज एन्ट्री करणारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्यांच्या उत्तम कामगिरी आणि बेधडक कारवायांमुळे नागरिकांची मने जिंकली . अस्सल नायक आहेत ,पिंपरी चिंचवड़करांच्या हृदयात ते जनू राज करत आहे, तसेच अनेक व्हाइट कॉलर दिग्गज गुन्हेगारांवर कारवाई केल्यामुळे त्यांच्या कामगिरीची नागरिकांकडूूून प्रशंसा केली जात आहे.
तर दुसरीकडे गुन्हेगारांना मदत करणाऱ्या अथवा गुन्हेगारीत सामील असलेल्या खलनायकांना आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कारवाईचा जनू धसकाच बसला आहे , आयुक्तांची “माझ्या शहरात गुन्हेगारांना सुटका नाही, मग ते कोणीही असो” अशी भूमिका असल्याने अनेक व्हाइट कॉलर गुन्हेगारांची झोप उडाली आहे असे समजून येते ,आणि गुन्हेगार मंडळी आयुक्तांच्या बदलीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे.
मात्र आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कामगिरीवर नागरिक खुश आहेत आणि त्यांचा कामाचे कौतुक देखील सर्वत्र होत आहे.