12 ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जाहिर ई - लिलाव



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे पिंपरी चिंचवड मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहिर ई - लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे १२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे .

वाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत . यात बस , ट्रक , डी.व्हॅन या वाहनांचा समावेश आहे . ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील . याची वाहन मालक , चालक , वित्तदाते यांनी नोंद घ्यावी .

Post a Comment

Previous Post Next Post