शेतकरी विरोधी काळे कायदे, खाजगीकरण, बेरोजगारीचा विरोधात संताप
प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील :
केंद्रातील मोदी सरकारने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे केले. तसेच या सरकारने देशाची संपत्ती विकण्याचा घाट घातला आहे. खाजगीकरणाचा सपाट लावला आहे. याचबरोबर 2 कोटी रोजगार देण्याचा विसर पडलेल्या केंद्र सरकारचा आज (27 सप्टेंबर) कर्जत काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशानुसार देशातील विविध समस्यामध्ये शेतकरीविरोधी तीन काळे कायदे, रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उदयोग, दुरसंचार आणि बंदरे, अशाप्रकारे मोदी सरकारने देशाची संपत्ती विकण्याचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
खाजगीकरण करणे तसेच तरुणांना 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन संपुष्टात आणले आहे. वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढीविरोधात लोकभावना लक्षात घेता कर्जत काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथील टिळक चौकात केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
याप्रसंगी माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्चद्रे, मुकेश सुर्वे यांनी केंद्र सरकारविरोधात विचार व्यक्त केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत, सरकारचा धिक्कार केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष धंनजय चाचड, मनोहर कदम, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष आवेश जुवारी, जिल्हा सचिव इस्माईल दिवाण, शहराध्यक्ष इरफान अत्तार, सुभाष मदन, दिनेश रावळ, अनंत देवळे, मंगल माळी, देविदास ऐनकर आदी उपस्थित होते."