ब्रेकींग न्युज : शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरूच राहणार–लोकप्रिय कार्यसम्राट मा.आमदार मनोहशेठ भोईर


ग्रामपंचायत वावेघर येथे रस्ता कॉक्रिटीकरण विकासकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.






प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील

रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत वावेघर, ता.-पनवेल, जि.- रायगड. हद्दीतील विकास कामाचे भूमीपुजन *मा.आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर* यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत जन सुविधा निधीमधून रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते.

सदर भूमिपूजन सोहळ्यप्रसंगी *मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, मी आमदार असताना संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये ज्याप्रकारे विकास कामे केली त्याच प्रमाणे. आतादेखील आपल्या *महाविकासआघाडी सरकारच्या* माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे मंजूर करून पुन्हा एकदा *उरण विधानसभेवर भगवा झेंडा* फडकवल्या शिवाय शांत बसणार नाही असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, तालुकासंपर्कप्रमुख अनंताशेठ पाटील, उपतालुकासंघटक सुधीर पाटील, मनोज पाटील-उरण, विभागप्रमुख ज्ञानेश्वर माळी, उपविभागप्रमुख भरत राउत, समाजसेवक महेंद्र गायकर, मा.सरपंच मनोज भांडारकर, उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी, ग्रा.पं.सदस्य अविनाश गव्हाणकर, गुळसुंदे शाखाप्रमुख प्रथमेश पाटील, जाताडे शाखाप्रमुख महेंद्र गायकर, ग्रा.पं.सदस्य अमित माळी, ग्रा.पं.सदस्य गुरुनाथ माळी, ग्रा.पं.सदस्य दिपक राठोड, ग्रा.पं.सदस्य दिपक मढवी, ग्रा.पं.सदस्य समृद्धी भगत, युवसेना अधिकारी प्रमोद गोळे, युवसेना उपअधिकारी महेश वाकडीकर उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post