ब्रेकींग न्यूज : नेरळ वाकस येथील विजय इस्टेटमधील फसवणुकीबाबत गुन्हा दाखल....


सदनिका बुक करणारे फसले, 1200 सदनिकाधारक यांची फसवणूक?

  



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल प्रतिनिधी. सुनिल पाटील :

                     कर्जत तालुक्यात नवनवीन जमीन घोटाळे समोर येत आहेत.त्यात तालुक्यातील वाकस येथे 100 एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिका बुक करणारे शेकडो ग्राहक यांची फसवणूक झाली आहे.त्यातील काही ग्राहकांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपली तक्रार दिल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात विजय इस्टेट ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

                     2013 पासून मुंबई मानखुर्द येथील 44 वर्षीय डॉ गजानन विनायक कागलकर यांनी विजय ग्रुप हौसिंग प्रायव्हेट लिमिटेडची जाहिरात पाहिली. कर्जत तालुक्यातील नेरळ जवळ वाकस येथे विजय ग्रुप कडून 100 एकर जमिनीवर गृह प्रकल्प उभा राहत होता.त्याबद्दलची जाहिरात बघून कर्जत तालुक्यात सेकंड होमचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ कागलकर यांनी 2017 मध्ये विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडच्या गृह प्रकल्पात घर घेण्यासाठी वाकस येथील साईट वर येऊन सुरू असलेले काम पाहिले.या 100 एकर मधील गृह प्रकल्पात फेज एक मध्ये वन बीएचके चा फ्लॅट घेण्याचे कागलकर कुटुंबीयांनी निश्चित केले.त्यानंतर डॉ कागलकर हे मुलगी रुपाली गजानन कागलकर आणि धनंजय चाचड यांच्यासह विजय ग्रुप हौसिंग कंपनीच्या ठाणे येथील कार्यालयात फेज एक मधील 319 कार्पेट क्षेत्र असलेला फ्लॅट 16 लाख 92 हजाराचा नक्की केला.ठाणे येथील विजयनगर भागातील कार्यालयात त्या सदनिकेबाबत डॉ कागलकर कुटुंबाने विजय ग्रुपचे सुनील सोनी यांच्याशी चर्चा करून घेण्याचे नक्की केले आणि 9999 रूपये अनामत रक्कम आपले जवळील बँकेचे डेबिट कार्ड मधून सदर रक्कम स्वॅप करून दिली.त्यानंतर कर्जत येथील सबरजिस्टर कार्यालयात 23 ऑगस्ट 2017 रोजी डॉ कागलकर यांचे नावे त्या सदनिकेची नोंदणी देखील झाली.या काळात डॉ कागलकर यांनी काही रक्कम विजय ग्रुप ला दिली असल्याची नोंद ऍग्रिमेंट मध्ये करण्यात आली आणि उर्वरित रक्कम यांचे हप्ते देणे कागलकर यांच्याकडून दिले जाऊ लागले होते.

                      2018 मध्ये कर्जत तालुक्यातील वाकस येथील विजय इस्टेट मधील गृह प्रकल्पाचे काम बंद झाले.त्याबाबत माहिती होताच डॉ कागलकर हे वाकस येथे आले आणि बंद पडलेल्या कामाची पाहणी केली.वाकस येथील विजय इस्टेट मध्ये एक हजाराहून अधिक लोकांनी बुक केलेल्या सदनिका बाबत मुंबई चर्चगेट येथील रेरा कार्यालयात तक्रारी देण्यास सुरुवात झाली.2020 पर्यन्त असंख्य सदनिका धारक यांनी रेरा कोर्टाकडे तक्रारी नोंदविल्या असून रेरा न्यायालयाने विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडचे संचालक अतीव गाला यांना संबंधित सर्व सदनिका धारक यांना त्यांनी बुक केलेली घरे देण्यात यावीत किंवा त्यांनी विजय हौसिंग कंपनीला दिलेली रक्कम व्याजासह परत करावी असे लेखी आदेश दिले होते.मात्र मागील वर्षभरात विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड कडून कोणत्याही सदनिका धारक यांना व्याजासह रक्कम किंवा सदनिका देण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे मुंबई मानखुर्द येथील डॉ गजानन कागलकर यांनी एप्रिल 2021 रोजी नेरळ पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाली आहे अशी लेखी तक्रार दिली होती.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सर्व कागदपत्रे यांची खात्री करून 18 सप्टेंबर 2021 रोजी विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडचे मालक अतीव गाला यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

                      नेरळ जवळील वाकस येथील विजय इस्टेट मध्ये 100 एकर जमिनीवर सर्व सोयी सुविधा यांनी परिपूर्ण असलेला गृह प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत चार मजल्यांच्या 40-50 इमारती देखील त्या गृह प्रकल्पात उभ्या राहिल्या आहेत.मात्र 2018 पासून तेथे सर्व कामे बंद असल्याने एक हजार हुन अधिक सदनिका धारक यांनी त्यांनी बुक केलेले फ्लॅट वेळेवर मिळाले नाहीत.रेरा कोर्टाने देखील विजय हौसिंग कंपनीला आदेश देऊन सदनिकाधारक यांना त्यांनी घर घेण्यासाठी दिलेले पैसे व्याजासह किंवा घर देण्याचे आदेश देखील यांचे पालन देखील कंपनीकडून करण्यात आले नाहीत.त्यामुळे या कंपनीचे मालक अतीव गाला यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात भादवी कलम 420,406 तसेच महाराष्ट्र महसूल मालकी हक्क अधिनियम 1963चे 4 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे अधिक तपास करीत आहेत.

विजय इस्टेट मध्ये सदनिका बुक करणारे मुंबई संताक्रूज येथील महेंद्र रामपाल आणि ठाणे कळवा येथील चंद्रकांत विनायक दांडेकर यांनी देखील नेरळ पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंद केली आहे.

विजय इस्टेटच्या वाकस येथील गृह प्रकल्पात 8000 सदनिका बांधल्या जाणार होत्या, त्यातील 1200 घरांची बुकिंग झाली असल्याची माहिती मिळत आहे.त्या सर्वांची फसवणूक देखील झाली आहे.त्यामुळे हा जमीन घोटाळा शेकडो कोटींचा असावा आता तर्क बांधला जात आहे.

राजेंद्र तेंडुलकर-प्रभारी अधिकारी, नेरळ पोलीस ठाणे 

या गृह प्रकल्पातील सदनिका नोंद करणाऱ्या जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या तक्रारी द्याव्यात.जेणेकरून आम्हाला पोलीस तपासात त्याचा फायदा होईल आणि सर्वांना न्याय देता येईल.

फोटो ओळ 

बंद पडल्येला प्रकल्प विजय ग्रुप.

Post a Comment

Previous Post Next Post