प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतमधील नेवाळी येथे असलेल्या फार्म हाऊस रिसॉर्टमध्ये तरुणीचे अश्लिल चित्रफीत बनविण्याचा प्रयत्न तेथे काम करणार्या नोकराने केला होता. ही बाब त्या तरुणीच्या भावाने पाहिली असता त्या नोकर तरुणाला नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेरळ जवळील नेवाळी गावाच्या हद्दीत सिद्धार्थ फार्म हाऊस आहे. त्या फार्महाऊसमध्ये पिकनिकसाठी डोंबिवली येथील आठ मित्र-मैत्रिणी पर्यटनासाठी आले होते. 28 सप्टेंबर रोजी त्या ग्रुपमधील एक 23 वर्षीय तरुणी तेथील स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून कपडे बदलण्यासाठी बंगल्यात गेली होती. तेथे बाथरूममधील शॉवरखाली आंघोळ करित असताना त्याबाबतचे चित्रफीत याच रिसॉर्टमध्ये काम करणारा विनीत वामन मोहिते याने काढले. ही बाब त्या तरुणीच्या भावाने पाहिले असता चित्रफीत बनविणार्या विनीत वामन मोहिते या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्यावेळी त्या नोकराच्या हाती असलेला मोबाईल तपासला असता त्यात चित्रफितचे रेकॉर्डिंग सुरू होते.
केअर टेकर तरुण विनीत वामन मोहिते (वय-34) रा. अंधेरी याला पकडून नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले. नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत त्या चित्रफीत बनविणार्या केअर टेकर तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे."