प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल : सुनील पाटील:
गेली दोन तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यात कुठेही नुकसान झाले नाही पंरतु नेरळ परिसरात माथेरान डोंगरातील पावसामुळे जलमय झाल्यामुळे दरम्यान नेरळ गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले असुन अनेकांच्या घरातील किमती चे साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे
वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस पडत असून 20 सप्टेंबराच्या रात्रीपासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही त्यामुळे कर्जत तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत
शेत पावसाने भरून वाहत असली तरी या पावसामुळे कुणाचे नुकसान झाले नाही त्यामुळे मुसळधार कोसळणारा पावसामुळे भाताच्या पिके आणखी जोमाने उभारी घेतील अशी आशा शेतकरी वर्गाला आहे मात्र माथेरानच्या पायथाशी असलेली दोन्ही धरणे भरून वाहत आहेत