प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
कर्जत खालापूर मतदारसंघाला अनेकवर्षांनंतर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला. तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघात विकासाची गंगा अत्यंत कमी कालावधीमध्ये गावागावात पोहोचवण्यास सुरवात केली. त्यांच्या या झंझावाती कामाने प्रेरित होत शिवसेनेची मोठी घौडदौड या तालुक्यात सुरु आहे. त्यामुळेच आमदार थोरवे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिलारवाडी, ताडवाडी, मोरेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत पुढील कालावधीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिवसेना पक्षाकडे येणाऱ्या नवीन नागरिकांचा व तरुणांचा ओघ सातत्याने वाढत आहे. ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे, संपर्क प्रमुख पंकज पाटील, मा उपसभापती मनोहर थोरवे, ज्ञानेश्वर भालीवडे, विभाग प्रमुख योगेश दाभाडे, संदेश सावंत, बाजीराव दळवी, माजी सरपंच रामचंद्र मिणमिणे, निल शेमटे, गणेश भगत तसेच पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.