खास वृत्त : आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या प्रयत्नाने संदिप नारायण पाटील यांच्या कुटुंबियांना १२ लाखांचा धनादेश सुपूर्द..

  संदिप नारायण पाटील यांच्या पत्नी किंवा मुलाला सी-बर्ड कंपनीत नोकरी देणार..





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पनवेल सुनील पाटील :

उरण तालुक्यात वशेणी येथील रहिवासी शिवसेनेचे कार्यकर्ते संदिप नारायण पाटील यांचा कामावर दुचाकीने जात असताना ट्रेलरच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला होता. घरातील करता-कमवीताच हरपल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. 

सदर अपघाताची माहिती मिळताच *शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण-पनवेल-खालापूरचे मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी त्या ठिकाणी जाऊन *ओम मुव्हिंग अँड स्टोरेज प्रा.लि. कंपनीच्या* अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संदिप पाटील याच्या कुटुंबियांना *ओम मुव्हिंग अँड स्टोरेज प्रा.लि. कंपनीकडून* बारा लाखांची आर्थिक मदत मंजूर करून घेतली होती. 

रविवार २६ सप्टेंबर २०२१ रोजी *मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी वशेणी येथील संदिप पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनाची भेट देऊन बारा लाखांचा धनादेश त्यांच्या कटुंबाकडे सुपूर्द केला. तसेच संदिप पाटील हे सी-बर्ड कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. *मा.आ.मनोहरशेठ भोईर* यांच्या प्रयत्नाने *संदिप पाटील* यांची पत्नी किंवा मुलाला *सी-बर्ड कंपनीमध्ये* नोकरीवर  सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

यावेळी सोबत शिवसेना कार्यकर्ते मनोज पाटील, वशेणी शाखेचे  पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post