एकदा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला व लोक प्रतिनिधीना जाग येणार का..?
पनवेल : सुनील पाटील :
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार केला होता मात्र हा रस्ता व साकव या वर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. तर एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी त्याला झोळी करत नेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील या रस्त्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने आदिवासींची हि उपेक्षा संपणार काही असा जळजळीत प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.
माथेरानच्या डोंगरात अनेक ठिकाणी आदिवासी बांधव राहतात. याठिकाणी जुमापट्टी धनगरवाडा ते बेकरेवाडी, नाण्याचा माळ, मान्यच माळ, अशा आसलवाडी पर्यंत सुमारे ११ आदिवासी वाड्या आहेत. मात्र दळणवळण म्हणून या वाडयांना रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे येथील आदिवासी बांधवानी शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून येथील रस्ता तयार केलेला होता. रस्त्याला वनविभागाचा अडसर असल्याने दरवर्षी येथील रस्ता येथील लोक कच्च्या स्वरूपाचा श्रमदानातून रस्ता बनवत असतात. मात्र यंदा २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील रस्ता पुरता वाहून गेला आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांचा संपर्क तुटला आहे. येथील बहुतांश आदिवासी बांधव हे नेरळ, माथेरान येथे कामाला आहेत. त्यामुळे हा रस्ता त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. मात्र रस्ता वाहून गेल्याने त्यांची आता परवड होत आह�