मोठी ब्रेकींग न्युज : कर्जत तालुक्यात बोगस जमीन मालक दाखवून जमीन व्यवहार कर्जत नेरळ जमीन घोटाळाची मालिका सुरूच , तर एका तरुणाला नेरळ पोलिसांकडून अटक...

 

कर्जत तालुक्यातील आणखी एक जमीन घोटाळा उघड....




 प्रेस मीडिया वृत्तसेवा :    पनवेल सुनील पाटील :


कर्जत तालुक्यात माणगावत जागा आहे मुळ मालकाचे 2011  मध्ये मृत झालेली व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन बोगस जमीन मालक दाखवून खोटे खरेदी खत यांच्या आधारे जमिनीची खरेदी करणार्‍या तरुणाला अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील माणगाव येथील आठ गुंठे क्षेत्र असलेली जमीन याच भागातील आसल येथे राहणारा संदीप राजाराम गायकवाड या तरुणाने बोगस मालकाकडून खरेदी केली. आरोपीला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मुंबई येथील राहणारे महंमद अफाक इसाक अन्सारी यांच्या त्रवडिलांची नावे कर्जत तालुक्यातील मौजे माणगाव ग्रामपंचायत हद्दीत आठ गुंठे जमीन आहे. सदर जमीन सर्व्हे नंबर ८३/४ ही जमीन ज्यांचे नावे आहे ते मूळ मालक २०११ साली मृत झाले आहेत. जमिनीचे मयत मालक यांच्या जमीन मालकाच्या जागी बोगस मालक यांनी आपणच जमिनीचे खरे मालक असल्याचे कर्जत तालुक्यातील आसल येथे राहणारे संदीप गायकवाड यांनी विकत घेतली.

२६ फेब्रुवारी २०२१ रोजी संदीप राजाराम गायकवाड यांनी सदर जमीनीची कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे जागेचे खरेदी व्यवहार पूर्ण केले. हा व्यवहार पूर्ण होताच जमिनीची नोंद करण्यात येत असताना या जमिनीचे प्रकरणी मूळ मालक यांनी संदीप गायकवाड यांनी आपली फसवणूक केल्याने त्या जमिनीचे मूळ मालक महंमद अफाक इसाक अन्सारी यांनी १२ में २०२१ रोजी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकरयांनी माहिती घेऊन तपासक अधिकारी श्रीकांत काळे यांना योग्य सूचना दिल्या.या गुन्ह्या बाबत  नेरळ पोलिसांनी खालील कलमे असून गुन्हे दाखल केले आहेत. 420,466,467,468,671,34, 


Post a Comment

Previous Post Next Post