क्राईम न्यूज : रायगड कर्जत तालुक्यातील गांजा विक्री करणाऱ्या जोडप्याला अटक

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील :

कर्जत तालुक्यात छोट वेणगावमध्ये राहणाऱ्या नवरा बायको यांना रंगेहाथ पकडले त्यांच्याकडून तब्बल 3 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे या धडाकेबाज कारवाई बद्दल कर्जत पोलीस ठाण्यातील सर्वात थरातु कैतुक होत आहे

               कर्जत तालुक्यात छोट्या वेणगाव येथे राहणार गणपत भागा वाडेकर आणि त्याची पत्नी उज्ज्वला गणपत वाडेकर हे दोघे अमली पदार्थांची विक्री करत असल्याची खबर कर्जत पोलिसांना लागली होती या गोपनीय माहिती मिळाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी खालापुर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष शुक्ला यांना दिली .

त्यांनंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी त्या अनुषंगाने सर्व काळजी घेत राहत्या घरी धाड टाकली असता या उभयतां कडे २० किलो ६०० ग्राम वजनाचा गांजा सापडला असून त्यांची किंमत तब्बल ३,२९,६०० रुपये एवढी असल्याचे समजते  हा लपवून ठेवलेला गांजा सापडला असल्याने या उभयतांने अमली पदार्थ बाळगल्या बद्द्ल एन डी पी. एस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली  असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजू आल्हट हे करत आहेत सदर महिला व इसम हे दोघांना चौकशी करता ताब्यात घेतले  त्यांच्याकडून सखोल चौकशी केल्यावर त्यांनी हा गांजा संगमनेर येथील मुख्तार शेख यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे मुख्तार शेख यांच्या घरी चौकशी करता  पोलीस गेले असताना त्यांना सदर आरोपी फरार असल्याचे समजले सदर गुन्ह्यामध्ये सापलेला गांजा हा ३,२९,६०० रु आणि वापरलेली चारचाकी रु ४०००० किमतीची या प्रमाणे एकंदर रु  ३,६९०००एवढे मुद्देमाल जप्त केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post