प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
ठाणे-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सदर प्रश्न सोडविण्या संदर्भात संबधित विभागाल मंत्री महोदयांनी दिले आदेश...बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी *महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री, मा.श्री.एकनाथजी शिंदे यांनी शिवस्मारक, जे.एन.पी.टी. येथे भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह .मंत्री महोदयांचे स्वागत केले.
सदर पाहणी दौरा हा ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर कशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्यात ज्यामुळे ट्राफिक व पार्किंग प्रश्न सुटेल यावर मंत्री महोदयांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख/विश्वस्त जे.एन.पी.टी. श्री.दिनेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.नरेश रहाळकर, शिवसेना तालुकप्रमुख श्री.संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख श्री.महादेव घरत, विधानसभा संघटक श्री सदानंदराव भोसले, तालुकासंघटक श्री.बी.एन.डाकी, शिवसेना गटनेता श्री.गणेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख श्री.विनोद म्हात्रे, उपतालुका प्रमुख प्रदिप ठाकूर, उपतालुकासंघटक के.एम. घरत, उपतालुकासंघटक अमित भगत, विभागप्रमुख संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, युवासेना विधानसभा अधिकारी श्री.नितेश पाटील, तालुका युवासेनाअधिकारी श्री.हितेश पाटील, वैद्यकीय कक्षप्रमुख रमेश म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका सौ. ममता पाटील, महिला विधानसभा संघटिका सौ.ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका सौ.भावना म्हात्रे, तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, तसेच सिडको चे अधिकारी वर्ग, जे.एन.पी.टी. चे अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी वर्ग, तहसिलदार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, उपतालुकासंघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, ग्रा.पं. सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.