माथेरान मधील अमित धनावडेची शिक्षण क्षेत्रात गगन भरारी

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील :

माथेरान सारख्या दुर्गम भागातून शिक्षण घेऊन पुढे जाणे म्हणजे एक प्रकारचे आव्हान आहे आणि ते आव्हान पेलत आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अमित धनावडे यांनी सिव्हिल इंजिनियरची डिग्री मिळवून शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे.

                 माथेरान मधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा.लहानपणापासून शिक्षणाची आवड.आई, वडीलांचे कमी शिक्षण असूनही आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे यासाठी त्याला सर्वतोपरी सहकार्य करत राहिले.माथेरान मध्ये दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी माथेरान बाहेर जाऊन कमी खर्चात शिक्षण पूर्ण केले.प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी येथे डिप्लोमा घेऊन डिग्रीसाठी सुद्धा त्याने अभ्यासक्रम सुरू ठेवला.इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे काही दिवसातच डिग्री सुद्धा घेतली.

                  त्याच्या या यशाबद्दल आई वडिलांनी समाधान व्यक्त केले असून त्याने आणखी पुढे जावं आम्ही त्याच्या बरोबर असू असे त्याचे वडील नरेंद्र धनावडे सांगतात.

Post a Comment

Previous Post Next Post