नोटबंदी नंतरही देशातील बनावट भारतीय चलन जप्त केल्याची प्रकरणं कमी झालेली नाहीत .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 नवी दिल्ली : केंद्र सरकारनं डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासह आणि निश्चलनीकरण केलं असलं तरी देशातील बनावट भारतीय चलन जप्त केल्याची प्रकरणं कमी झालेली नाहीत.एकट्या महाराष्ट्रात 2020 मध्ये पोलिसांनी 97 जणांकडून 6 लाख 99 हजार 495 भारतीय बनावट नोटा पकडल्या. ज्याचे एकूण मूल्य 83.61 कोटी रुपये होतं. एनसीआरबीच्या  ताज्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात बनावट नोटा जप्त केल्याची 42 प्रकरणं नोंदवण्यात आली. NCRB च्या अहवालानुसार, 2020 मध्ये देशात एकूण 92.18 कोटी किमतीच्या 8 लाख 34 हजार 947 बनावट भारतीय चलन पकडलं गेलं. 2019 मध्ये पकडलेल्या एकूण बनावट भारतीय चलनापेक्षा हे 190.5 टक्क्यांनी अधिक आहे. NCRB नुसार, 2019 मध्ये एकूण 2 लाख 87 हजार 404 बनावट भारतीय चलन पकडलं गेलं.ज्याचं एकूण मूल्य 25.39 कोटी रुपये होतं. बनावट भारतीय चलनाची एकूण 385 प्रकरणं देशभरातील विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहेत. 


पश्चिम बंगालमध्ये नोंदवली सर्वाधिक 81 प्रकरणं ..

देशात बनावट नोटा पकडल्याची सर्वाधिक 81 प्रकरणं पश्चिम बंगालमध्ये नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये, पोलिसांनी एकूण 111 लोकांना अटक केली आणि 24 हजार 227 बनावट नोटा पकडल्या, ज्यांची किंमत 2.46 कोटी होती. यानंतर यूपीमध्ये 52 प्रकरणं नोंदवण्यात आली.

यात 55 जणांच्या अटकेसह 17 हजार 78 बनावट नोटा जप्त केल्या. त्याची एकूण किंमत 38.79 लाख रुपये होती. गुजरातमध्ये 23 प्रकरणांमध्ये 32 जणांना अटक करण्यात आली. इथं 20 हजार 360 बनावट नोटा सापडल्या.

याची किंमत 87.96 लाख रुपये होती. हे 9 वीत शिकणाऱ्या मुलाची कमाल; भंगारातल्या 'रॉयल एनफिल्ड'पासून बनवली इलेक्ट्रिक बाईक मध्य प्रदेशात 5 प्रकरणांमध्ये 2 हजार 85 बनावट नोटा सापडल्या. त्यांची एकूण किंमत 2.02 लाख रुपये होती. दिल्लीत 4 प्रकरणांमध्ये 3 हजार 476 बनावट नोटा पकडल्या गेल्या.

यांची एकूण किंमत 4.16 लाख रुपये होती. पंजाबमध्ये 95.80 लाख रुपये किमतीच्या 14 हजार 444 बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर, राजस्थानात 27.35 कोटी रुपये किमतीच्या 6 हजार 190 बनावट नोटा पकडल्या गेल्या. 2020 मध्ये देशभरात पकडलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये एकूण 633 लोकांना अटक झाली.

किती किमतीच्या किती बनावट नोटा पकडल्या गेल्या .....

NCRB च्या अहवालानुसार, 2020 मध्ये देशात एकूण 8 लाख 34 हजार 947 बनावट नोटा पकडल्या गेल्या. यामध्ये 2000 रुपयांच्या 2 लाख 44 हजार 834 नोटा, नोटाबंदीपूर्वी 1000 रुपयांच्या 3 लाख 18 हजार 143 नोटा, जुन्या 500 रुपयांच्या 5 हजार 789 नोटा आणि नवीन 500 रुपयांच्या 2 लाख 9 हजार 685 बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्याचप्रमाणे 200 रुपयांच्या 11 हजार 841 नोटा, 100 रुपयांच्या 33 हजार 443 आणि 50 रुपयांच्या 1589 नोटा, नवीन 50 रुपयांच्या 8599 नोटा, 20 रुपयांच्या 34 आणि 10 रुपयांच्या 990 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 

देशभरात सापडलेल्या एकूण बनावट नोटा प्रकरणांपैकी 8 टक्के प्रकरणं महाराष्ट्रात देशातील एकूण बनावट प्रकरणांपैकी 8 टक्के प्रकरणं महाराष्ट्रात झाली आहेत.

NCRB च्या ताज्या अहवालानुसार, 2020 मध्ये IPC च्या कलम 231 ते 243, 255 आणि 489-A ते 489-E अंतर्गत एकूण 672 प्रकरणं नोंदवण्यात आली. यामध्ये सुमारे 8 टक्के म्हणजेच 54 घटना महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रापेक्षा जास्त म्हणजे 109 प्रकरणं पश्चिम बंगालमध्ये, 63 आसाममध्ये आणि 55 उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली. याशिवाय, बनावट नाणी, बनावट सरकारी शिक्के, चलनी नोटा आणि बँक नोट्स बनावट करणे, बनावट चलनी नोटा किंवा बँक नोट्स अस्सल म्हणून वापरणं, त्या जवळ बाळगणं अशा गुन्ह्यांसाठी उपकरणं बाळगल्याच्या प्रकरणांमधले तसंच, अशा प्रकरणांमध्ये लागणारं इतर साहित्य तयार करणे किंवा ठेवणे आणि चलनातील नोटा किंवा बँक नोट्ससारखी कागदपत्रं तयार करणे किंवा वापरणे अशा गुन्ह्यांपैकी मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 49 गुन्हे, गुजरातमध्ये 27, हरियाणामध्ये 18, पंजाबमध्ये 25 आणि दिल्लीमध्ये 32 गुन्हे दाखल झाले.

Post a Comment

Previous Post Next Post