प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनीधी :
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे . वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ ने अखेरचा श्वास घेतला आहे .
सिद्धार्थ शुक्ला यांनी 2008 मध्ये बाबुल का अंगण या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'लव्ह यू जिंदगी', 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक' मधील भूमिकांसाठी ती ओळखली जाते. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे . सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे .आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले