राजकारणात संपलेल अस्तित्व आणि स्वतःच्याचं पक्षात संपुष्टातं आलेली कारकिर्द पुन्हा प्रस्थापित करण्याचा सोमैया यांचा केविलवाणा तमाशा सुरु आहे.... राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा सुरु आहे. कोल्हापूरकडे रवाना झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना कऱ्हाडमध्येच उतरवण्यात आले.किरीट सोमैय्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

 सोमैय्यांच्या या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून भाजपसह सोमैय्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनीही सोमैय्यांचा हा दौरा म्हणजे केविलवाणा 'तमाशा' असल्याचे म्हटले अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांच्या विषयी ट्विट करत म्हटले,'राजकारणात संपलेल अस्तित्व आणि स्वतःच्याचं पक्षात संपुष्टातं आलेली कारकिर्द पुन्हा प्रस्थापित करण्याचा सोमैया यांचा केविलवाणा तमाशा सुरु आहे..सोमैया यांची अवस्था पडद्यामागच्या नेत्यांनी 'न घर का न घाट का ' अशी  करून ठेवली आहे..


Post a Comment

Previous Post Next Post