प्रेस मीडिया वृत्तसेवा : धनंजय हलकर (शिंदे)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मिरज उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. तिळवे यांची आर.पी.आय. मिरज शहर शिष्ठ मंडळाने जनकल्याणार्थ घेतली भेट.
आर.पी.आय.(आठवले) मिरज शहर चे शिष्ठ मंडळ आज सोमवार दि. २७/०९/२०२१ रोजी म.रा.वि.वि.कं. मिरज उपविभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. बी.एस. तिळवे यांची विज ग्राहकांच्या समस्ये संदर्भात भेट घेतली.
या वेळी आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे म्हणाले, मिरज शहरामध्ये तसेच तालुक्यात विज मंडळाच्या वतीने थकीत विज बिल ग्राहकांना विश्वासात न घेता अथवा कोणतीही पुर्व सुचना नदेता विज कनेक्शन बंद करणेचे कार्य सुरू आहे. हे विज कनेक्शन बंद करणे पुर्वी विज ग्राहकांना लेखी सुचना करणे महत्वाचे आहे. जे विज ग्राहक ५०% विज रक्कम अदा करत आहेत त्यांचे विज कनेक्शन तोडू नये. तसेच बौद्ध वसाहत, सिद्धार्थ वसाहत, आण्णाभाऊ साठे वसाहत, ऊत्तमनगर, पंढरपुर चाळ, सावित्रीमाई फुले वसाहत, ख्वाजा वसाहत, मिरज येथे रोजंदारीवर कामाला जाऊन उदरनिर्वाह करणारी कुटूंबे स्थायिक असुन येथील विज ग्राहकांकडे सहानुभूती दाखवून तीन टप्यांमध्ये विजबिल भरणेची मुभा द्यावी. अशी सुचना यावेळी मा. तिळवे साहेबांना करणेत आली.
यावर प्रतिक्रिया देताना मा. तिळवे साहेब म्हणाले, आपल्या सुचनांवर विज मंडळाचे वरिष्ठ अभियंता यांचेशी चर्चा करून आर.पी.आय. मिरज शहर शिष्ठ मंडाळाच्या सुचनांबद्दल योग्य निर्णय घेवू असे आश्वासन दिले.
यावेळी आर.पी.आय.(आठवले) चे मिरज शहराध्यक्ष मा. अविनाश कांबळे, मिरज शहर संपर्क प्रमुख मा. प्रमोद वायदंडे, आय.टी.सेलचे मिरज शहर प्रभारी मा. पृथ्वीराज रांजणे उपस्थित होते.