लग्नाचे अमिश दाखवून पावणे दोन लाखांची फसवणूक, चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या व्यक्तीने एका महिलेकडून लग्नाचे अमिश दाखवून पावणे दोन लाखांचे दागिने, रोख रक्कम नेली. त्यांनतर महिलेसोबत विवाह न करता तिची फसवणूक केली.ही घटना 18 जुलै ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत चिखली येथे घडली.

किरण कालिदास पाटील (वय 40, रा. आसरा, विशाल नगर, जमखंडी मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी किरण यांची संगम डॉट कॉम या सोशल मॅट्रिमोनी साईटवर 18 जुलै 2021 रोजी ओळख झाली. 27 ऑगस्ट रोजी आरोपी किरण हा फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने लग्नाचे अमिश दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी कडून आरोपीने चार तोळे वजनाचे गंठण, दोन तोळे वजनाची अंगठी, 50 हजार रोख रक्कम असा एकूण एक लाख 70 हजार रुपयांचा ऐवज नेला. फिर्यादी महिलेसोबत विवाह न करता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post