उत्तर प्रदेश सरकार धर्मांतराच्या नावाखाली फाळणीचे राजकारण करत आहे..... जमीयेत उलामाय हिंद

  


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पिंपरी चिंचवड जमीयेते उलामाय हिंद व इतर विविध मुस्लिम समाजातील संघटना यांनी पिंपरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर उत्तर प्रदेश सरकार व ATS यांनी मौलाना कलीम सद्दीकी साहेब यांना धर्मांतराच्या खोट्या आरोपा खाली अटक केली म्हणून जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले ,त्या वेळी मौलाना अलीम  म्हणाले की, या वेळी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने आपल्या अपयशांपासून लोकांचे लक्ष हटवण्याचे आणि त्याच्यात जातीय राजकारणाला हवा देण्याचे नवे षड्यंत्र रचत आहे, ज्या अंतर्गत प्रख्यात मौलाना कलीम सिद्दीकी सारख्या मुस्लिम विद्वानांचे अपहरण करतात तशा पद्धधतीने अटक करण्यात आली आहे,  सध्याचे सरकार गोंधळात पडलेले असून  एखादा मुद्दा शोधत आहे . म्हूणून ध्रुवीकरनाचे राजकारण केले जात आहे, आणि सरकारच्या अपयशापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.

मौलाना कलीम सिद्दीकी हे मुझफ्फरनगर किंवा पश्चिम उत्तर प्रदेशचेच नव्हे तर जगभरातील मुस्लिम विद्वान म्हणून ओळखले जातात.  म्हणूनच त्यांचे कार्यक्रम जगभरात होत असतात.  मौलाना कलीम प्रत्येक व्यासपीठावरून परस्पर सौहार्द आणि बंधुत्वाबद्दल बोलतात. त्यांना तात्काळ सोडण्यात यावे ,

त्यावेळी जमियेत उलमा पिंपरी चिंचवड अध्यक्ष हाजी गुलजार म्हणाले देशाच्या विविध भागात मुस्लिम समाजातील नागरिकांचे मोब्लिंचिंग केले जात आहे  ,त्यावर सरकारने प्रतिबंधत्मक पावलं उचलावी व त्या वर कठोर कायदा अस्तित्वात आणावा व अमलबजावणी करावी, या वेळी  धम्मा साळवे साहेब म्हणाले भारतीय संविधानाने प्रत्यक भारतीय नागरिकाला आपल्या धर्माच्या प्रचार व प्रसार करण्याचे अधिकार दिले आहेत,विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि जन समुदाय अल्पसंख्यांक मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post