पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळे येथे पुणे मुबंई बेंगलोर महामार्गाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित होणार

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळे येथे पुणे ते मुबंई आणि मुंबई ते पुणे असे जाणाऱ्या व येणाऱ्या मुंबई बेंगलोर महामार्गाच्या दुभाजकामध्ये मोठा चौक असुन तेथे मोकळी जागा आहे. ती जागा विकसित झाल्यास शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

महामार्गाच्या संमातर असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या किवळे येथील मोकळ्या जागेत चेंबुरच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित करण्यासाठी नाहरकत दाखला मिळावा यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

चेंबूर, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसीत केला आहे. हा चौक संपुर्ण मुबंई शहराची ओळख बनला आहे. चेंबूर, मुंबईच्या धर्तीवर पिंपरी चिवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळे येथील पुणे ते मुबंई आणि मुंबई ते पुणे असे जाणाऱ्या व येणाऱ्या मुंबई बंगळूर महामार्गामधील असणाऱ्या मोकळ्या जागेवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खर्चाने छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित करण्याचा मानस आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तेव्हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या किवळे येथील दुभाजकाच्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित करण्यासाठी नाहरकत दाखला मिळणे गरजेचे आहे जेणेकरुन किवळे येथील शहराचे प्रवेशद्वार पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत विकसित करणे शक्य होईल. यासाठी नाहरकत मिळावी असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post