प्रेस मीडिया वृत्तसेवा : दत्तवाड : प्रतिनिधी :
दत्तवाड : बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाचा वसा विद्यार्थ्यांनी जोपासावा . विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे , असे मत कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी व्यक्त केले .
दत्तवाड येथील ग्रा . पं . सभागृहामध्ये झालेल्या विविध परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी दत्तवाडचे मंडल अधिकारी विनायकराव माने हे होते . विनायकराव माने म्हणाले , विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या अधिकार यांच्याकडून परीक्षेची प्रेरणा द्यावी . विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविताना नैसर्गिक आपत्ती किंवा इतरअडचणीविरुद्ध लढले पाहिजे . गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगुले , आण्णाप्पा सिदनाळे यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी दहावी , बारावी , एनएमएमएस आदी परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . तलाठी अश्विनी खराडे , महावितरण अभियंता रवींद्र पाटील , चंद्रकांत कांबळे , बाळासो कोकणे , उपसरपंच नाना नेजे , दौलत माने , धन्यकुमार सिदनाळे , सर्व ग्रा . पं . सदस्य आदी उपस्थित होते . ग्रा . पं . सदस्य संजय पाटील यांनी आभार मानले .