क्राईम न्यूज : नवऱ्याला मागे घ्यायला सांग,अशी दमदाटी करत तीन जणांनी मिळून एका महिलेच्या घरात घुसून केली हॉकीस्टीकने मारहाण .

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड़ ,दि.१३ जुन्या भांडणात दाखल केलेली केस नवऱ्याला मागे घ्यायला सांग,अशी दमदाटी करत तीन जणांनी मिळून एका महिलेच्या घरात घुसून हॉकीस्टीकने मारहाण केली. ही घटना शनिवारी दि.११सकाळी साडेदहा वाजता पत्रा शेड चिंचवड येथे घडली. स्नेहा आकाश काळे (वय 25, रा. पत्राशेड लिंक रोड, श्रीधरनगर, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक गायकवाड, शिला गायकवाड, सारिका गाडकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आणि आरोपी यांच्यात जुनी भांडणे आहेत, या प्रकरणी आरोपींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही केस मागे घेण्यासाठी दमदाटी करत आरोपी हे काळे यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. तुझा नवरा कुठे गेला आहे, त्याला केस मागे घ्यायला लाव, असे म्हणत आरोपींनी काळे यांचे हातपाय पकडून मारहाण केली. दरम्यान, आरोपी आकाश याने हातातील हॉकीस्टीकने स्नेहा काळे यांच्या डाव्या पायावर मारून गंभीर जखमी केले. सदर घटनेवर चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post