प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
वडगाव शहरातील नागरीकरण वाढत असल्याने येथील रस्ते प्रशस्त व मूलभूत सेवा-सुविधा सुसज्ज असाव्यात, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. आमदार सुनिल अण्णा शेळके म्हणाले,वडगाव मावळ येथील वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांची आमदार सुनील शेळके यांनी पाहणी केली, त्यानंतर वडगाव नगरपंचायतमध्ये आढावा बैठक घेण्यात आली.
वडगाव मधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे माझे काम आहे. पण नगरसेवकांनी देखील कामे दर्जेदार व वेळेत करून घ्यावीत आणि शहराच्या सौंदर्यात भर घालावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी सर्व नगरसेवकांना केले आहे,
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पूजा वहिले, मुख्याधिकारी जयश्री काटकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर,प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, अर्चना म्हाळसकर, सायली म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, उद्योजक राजेश बाफना, विशाल वहिले आदी उपस्थित होते.