खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ सदर रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे हस्तांतरित करीत असल्याचे जाहीर केले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : कोल्हापूर :

 कोल्हापूर - रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगली पर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे हस्तांतरण करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांचेकडे खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे केली आहे.खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ सदर रस्ता नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे हस्तांतरित करीत असल्याचे जाहीर केले. त्यामूळे मृत्यूचा सापळा बनलेला सांगली-कोल्हापूर महामार्ग आता मोकळा श्‍वास घेणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

दरम्यान,कराड येथील लोकार्पण आणि विविध रस्ते कामाचा कोनशिला अनावरण कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी ही घोषणा केली. पुढील सहा महिन्यांत या रस्त्याचा डीपीआर तयार करून घेऊन नवीन रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी जाहिर केले.

पूर्वी सांगली- कोल्हापूर या बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बनविन्यात आलेल्या या रस्त्यावर यापूर्वी खर्च केलेली सर्व रक्कम राज्य शासन देणार आहे. हा रस्ता नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे वर्ग झाल्यामुळे सदर रस्ता पूर्णत्वाकडे जाणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post