माथेरान पालिकेवर पुन्हा भगवा फडकला पाहिजे हे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
माथेरान पालिकेवर भगवा फडकला पाहिजे हे पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पहायचे आहे,कारण माथेरान हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्र राज्याची मान आहे आणि आपल्या शिवसेनेची शान आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री,लोकसभेतील गटनेते खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
माथेरान नगरपरिषद मधील कर्मचारी वर्गाने शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेची कामगार युनियन स्वीकारली आहे.त्या कामगार युनियनच्या नामफलकाचे अनावरण शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार,माजी केंद्रीय मंत्री,भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांचे हस्ते झाले.माथेरान मधील श्रीराम चौकात नामफलकाचे अनावरण प्रसंगी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार भरत भगत, माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी,शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत,महिला आघाडी शहर संघटक जांभळे,माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,माजी उपनगराध्यक्ष हिरावती सकपाळ,भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी जाधव,कामगार प्रतिनिधी रत्नदीप प्रधान,सागर पाटील, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर येथील कुमार प्लाझा हॉटेल येथे शिवसेना मेळावा आणि कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात माथेरान नगरपरिषद गटनेते आणि बांधकाम समिती सभापती प्रसाद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार अरविंद सावंत यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.तर माथेरान शिवसेना पक्षाचे वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले.त्यावेळी नगरसेवक शकील पटेल,राजेंद्र शिंदे,नरेश काळे,कीर्ती मोरे, नगरसेवक संदीप शिंदे,प्रकाश सुतार,अवधूत येरफुलें,फकीर महापुळे,दीपक जाधव,मीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष रेखा चंद्रकांत चौधरी,माथेरान वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव,आदी उपस्थित होते.
लोकसभेतील गटनेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकट्याचे ताकदीवर विधानसभेचे 56 आमदार निवडून आले हा महाराष्ट्रात इतिहास आहे.त्यात शिवसेनेचा आकडा विधानसभेत कसा कमी राहील यासाठी आपला मित्र पक्ष प्रयत्न करीत होते.त्यामुळे नियतीच्या मनात होते आणि म्हणून कोणाचेही स्वप्नात नसताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.अरविंद सावंत यांनी माथेरानकरांना आवाहन करताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात युतीची सत्ता असताना 3000 हजारांचे मतांचे शहर असलेल्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील प्रश्न घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यशी बैठक घेतली आणि त्यांना प्रश्न सांगितले हे माथेरानकरांनी विसरून नये असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले.माथेरान ही आमच्या महाराष्ट्राची मान आहे आणि शिवसेनेची शान आहे हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगणे राहिले आहे.त्यामुळे माथेरानकरांनी शिवसेनेची साथ कायम दिली पाहिजे असे आवाहन शेवटी अरविंद सावंत यांनी केले. पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर बोलताना अरविंद सावंत यांनी वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे सर्वांना एकत्रित घेऊन काम करावे आणि संघटना बळकट करून नवीन माथेरान घडवायचे आहे असे आवाहन देखील केले.
यावेळी माथेरान नगरपरिषद कामगार संघटनेच्या युनिटमध्ये अध्यक्ष म्हणून रत्नदीप प्रधान, उपाध्यक्ष सागर पाटील,सचिव अनिल नाईकडे यांची तर कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अवधूत येरफुले,सह कार्याध्यक्ष रमेश जोशी,तर सहसचिव नरेश पुरबिया,सह खजिनदार सचिव छगन पूरबिया यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यांना भारतीय कामगार सेनेच्या युनिटचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी कामगार संघटनेचे माथेरान युनिट अध्यक्ष रत्नदीप प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आपल्या भाषणात शहरात सुरू झालेल्या विकासकामांची माहिती दिली आणि त्या जोरावरच आपण पालिकेवर भगवाच फडकेल अशी खात्री यावेळी व्यक्त केली.
त्यानंतर प्रसाद सावंत यांनी माथेरान नगरपरिषद आणि शिवसेनेचे बाबतीत घडलेल्या घडामोडी याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विकासकामे झाली आणि पर्यावरण पूरक विकास कामे होऊ शकली.यावेळी नेरळ माथेरान नेरळ मिनिट्रेन लवकर सुरू व्हावी अशी मागणी यावेळी केली.तसेच पर्यावरण पूरक विकासकामे करण्यासाठी ठराविक काळात वाहनांना परवानगी द्यावी अशी मागणी लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांच्याकडे केली.