कसारा घाट आता अवघ्या पाच मिनिटांत पार करता येणार



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कसारा घाट म्हटले की नागमोडी वळणे, पावसाळ्यात सातत्याने कोसळणाऱया दरडी आणि त्यामुळे तासन्तास होणारी वाहतूककाsंडी.. मात्र आता या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील शहापूरच्या वाशाळा ते इगतपुरीच्या नांदगावपर्यंत तब्बल आठ किलोमीटरच्या दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून हा घाट आता अवघ्या पाच मिनिटांत पार करता येणार आहे.रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत आज या बोगद्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे लवकरच वाहनचालकांसह लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

55 हजार कोटी रुपये खर्चून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. 700 किलोमीटरच्या या मार्गात इगतपुरीतील हे दुहेरी बोगदे महत्त्वाचे टप्पे होते. मात्र एफका@न इन्फ्रास्ट्रक्चर पंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख यांच्यासह जवळपास 1600 कामगार व इंजिनीयरच्या टीमने गेली दोन वर्षे युद्ध पातळीवर काम केल्याने देशातील सर्वात रूंद असलेल्या या बोगद्यांचे काम वेळेत तडीस गेले. दोन्ही बोगदे आठ किलोमीटर लांब तर 17.5 इतके रुंदीचे आहेत. रस्ते विकास महामंडळाचे अनिलपुमार गायकवाड व उपजिल्हाधिकारी तथा एमएसआरडीएच्या प्रशासक रेवती गायकर यांनी अभियंत्यांसह या बोगद्याच्या कामाची पाहणी केली.

ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर

2745 कोटी रुपये खर्च करून खोदण्यात आलेल्या या बोगद्यांसाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वाहतूककाsंडी नसेल तर हा बोगदा पार करायला जवळपास अर्ध्या तासाचा वेळ लागतो. परंतु आता केवळ पाच मिनिटात वाहनचालकांना घाट पार करता येणार आहे. एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर पंपनीने या बोगद्याचे काम केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post