प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड शहरात मागील दहा दिवसांपासून खून सत्र सुरू आहे. मागील दहा दिवसांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ खून झाले आहेत . या आठ खुनांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
# 16 सप्टेंबर रोजी रावेत येथे सौंदव सोमरु उराव या सुरक्षा रक्षक महिलेचा खून झाला. तिने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार घडला. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी घोरावडेश्वर येथे एका नवविवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला.
# 20 सप्टेंबर रोजी दुसरी खुनाची घटना निगडी ओटास्किम येथे घडली. संपत गायकवाड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून करण्यात आला.
# 21 सप्टेंबर रोजी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या. चिखली येथे वीरेंद्र उमरगी या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरात खून करण्यात आला. तर त्याच दिवशी हिंजवडी जवळ सुस येथे एका सुरक्षा रक्षकाने त्याच्या सुरक्षा रक्षक मित्राला ठार मारले. मित्राने पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने हा खून झाला आहे.
# 22 सप्टेंबर रोजी रात्री रावेत येथे एक खुनाची घटना उघडकीस आली. खैरून बी या महिलेचा तिच्या राहत्या घरात पतीने वस्त्राच्या नाडीने गळा आवळून खून केला. कहर म्हणजे पती त्याच्या पोटच्या तीन मुलांना रस्त्यावर सोडून निघून गेला.
# 23 सप्टेंबर रोजी सकाळी डांगे चौक येथे रोशन कांबळे या व्यक्तीचा खून झाला. 25 सप्टेंबर रोजी धावडे वस्ती, भोसरी येथे एका महिलेचा खून झाला आहे.