कर्जत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्या हद्दीत 6 गुन्ह्याची नोंद आहे व ते उघडकीस आले
प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील
चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम, पॅनकार्ड एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरी चोरी करणाऱ्या चोराच्या कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अधिक पोलीस तपासात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्यावर 6 गुन्हे नोंद असल्याची घटना समोर आली आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत भिसेगाव राहणारे संतोष अरुण भोसले (वय-40) हे पहाटे 4-40 वाजता नोकरी निमित्त मुंबई कडे जात असताना येथील कर्जत रेल्वे स्टेशनच्या टिकीट घराजवळ, एम.एस.ई.बी ऑफीससमोर आल्यावर त्यांना अज्ञात इसमाने चाकुचा धाक दाखवुन भोसकुन ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळी करुन त्याच्या जवळील रोख रक्कम 500 रुपये व पॅनकार्ड, ए.टी.एम कार्ड असा माल जबरीने चोरुन नेला होता.
संतोष भोसले यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत कर्जत पोलीस पोलीस ठाणे येथे गु.र.नं.251/2021 भा.दं.वि.क.392,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार स्वप्नील येरूणकर,पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार गणेश पाटील, पोलीस अंमलदार अश्रूबा बेंद्रे यांनी तपास सुरू केला.
फिर्यादी भोसले यांनी दिलेल्या अज्ञात चोरट्याच्या माहितीत आरोपीचा उजवा डोळा हा काना आहे यावरून पोलीस अंमलदार भूषण चौधरी यांनी गुप्त बातमीदारकडून अज्ञात आरोपीची माहिती घेतली, सदर गुन्ह्यातील संशयीत इसम रोहीत लालता गौतमउर्फ याकूब वय वर्ष 23 राहणार कर्जत भिसेगाव क्रांतीनगर याला गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक तासाच्या आत ताब्यात घेतले त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे
या सराईत गुन्हेगाराला कर्जत पोलीस साने या सर्व गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या मुले कर्जत शहरातून तसेच ग्रामीण भागातून पोलिसांचे कौतुक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे