प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात जडअंत:करणाने पाच दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनास नागरिकांतून उदंड प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन व निर्माल्य कुंडास नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली. तर शहापूर खण येथे घरगुती गणपती विसर्जनाची सुरुवात नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली. नागरिकांतून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नगराध्यक्षा ॲड. सौ. अलका स्वामी यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याचबरोबर नागरिकांची गर्दी होवु नये यासाठी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी होवु नये म्हणून नगरपरिषदेच्या वतीने विविध 30 ठिकाणी विसर्जनाची सोय करुन देण्यात आली होती. नगराध्यक्षा सौ.स्वामी यांनी नागरिकांनी शासन नियमांचे पालन करुन प्रशासनाच्यावतीने सोय करुन देण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात व शहापूर खण येथे श्री मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले होते.
त्याला सर्वच भागातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे .शहापूर येथे श्री मूर्ती* *विसर्जनप्रसंगी आरोग्य सभापती संजय केंगार, भाऊसो आवळे, रणजित अनुसे, नितिन कोकणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगरसेवक किसन शिंदे, मंगेश कांबुरे,अब्राहम आवळे, विश्व हिंदु परिषदेचे शिवजी व्यास, सदा मलाबादे, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू फोर्स, स्वंसेवक शहापुर भागातील मंडळाचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.*