प्रेस मीडिया वृत्तसेवा :
निवेदनात म्हटले आहे की, सध्याचा पोषण ट्रॅकर ॲप वापरण्यास हा मोबाईल योग्य नाही. दैनंदिन कामाची माहिती अपलोड करताना मोबाईल बंद पडतो. या निकृष्ट दर्जाच्या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नाईलाजाने सर्व निकृष्ट दर्जाचे मोबाईल प्रकल्प कार्यालयात जमा केले आहेत.
शासनाने आम्हास पोषण ट्रॅकर ॲप मराठी द्यावे व नवीन चांगल्या प्रतीचे मोबाईल द्यावेत, यासाठी कृती समितीतर्फे हे आंदोलन सुरू आहे. प्रकल्पात जमा केलेले मोबाईल परत घ्यावेत, यासाठी दबाव आहे. पण, जमा केलेले मोबाईल सेविका परत घेऊन जाणार नाही. त्यांचे नित्याचे काम त्या रजिस्टरवर करतील, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमनी गायकवाड, जिल्हाध्यक्ष आनंदी भोसले, कार्याध्यक्ष विजया जाधव, जिल्हा सचिव नागिरा नदाफ, कविता शिंदे, अलका माने, नीलप्रभा लोंढे, अलका विभूते, मधुमती मोरे, रेखा साळुंखे, राणी जाधव, आदी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांचा शुक्रवारी संप
केंद्र शासनाच्या खासगीकरण धोरणाविरोधात, अंगणवाड्या वाचविल्या पाहिजेत आणि जाचक कामगार कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दि. २४ सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविका एक दिवसाचा संप करणार आहेत, अशी माहिती आनंदी भोसले यांनी दिली.