प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी 15 दिवसांनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे. पलकात आंदाचा वातावरण निर्माण झालेल दिसून येत आहे,पाले ही शाळेत जान्यासाठी उस्साहित झालेले आहेत,
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेली गर्दी आणि कोरोना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका यावर नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्सचा विचार घेऊन निर्णय घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या होत्या अखेर, शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवात कोरोनाचे आकडे फारसे वाढलेले दिसत नाहीत, सोबतच दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दरम्यान कोरोना परिस्थिती पाहून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे चाइल्ड टास्क फोर्सने म्हटल्याची माहिती समोर आली आहे.