प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील:
दान फाटा येथे दुकानदारांना राहिला नाही भान दुकानातील ओला-सुका कचरा रस्त्याच्या लगतच टाकत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .रसायनी पाताळगंगा इंडस्ट्रीज एरिया मोठा असल्यामुळे दान फाटा हा मुख्य द्वार समजला जातो काही दिवसांपूर्वीच येथे सुलभ सौचालय बस स्टॉप पोलीस चौकी लाईट हायमास्ट सुशोभित करण्यात आले आहे .
येथील भाजी विक्री करणारे , किराणा मालाचे ,चायनीज चिकन सेंटर ,मटण विक्रेते ,स्वीट मार्ट मिठाईवाले यांचा ओला सुका कचरा काही अंतरावर रस्त्या लगतच टाकलेला दिसत असून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याच्यावर झालेल्या जीवजंतू माशा लागलीस त्याच अंतरावर दुकानात घुस्ताना दिसतात यामुळे होणारे आजार होण्याची दाट शक्यता असून ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा व आरोग्य विभाग यांनी त्याची तातडीने पाहणी करून कारवाई करण्यात यावी किंवा त्यांच्या कचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे.