चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना विनम्र अभिवाद




 प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील

२५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करताना *शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर* तसेच यावेळी मा.सभापती भास्कर मोकल, शिवधन पातपेढीचे चेअरमन गणेश म्हात्रे, ग्रा.पं. सदस्य धनेश ठाकूर, उपजिल्हासंघटिका ज्योती म्हात्रे, चिरनेर ग्रा.पं. चे सर्व सदस्य इतर मान्यवर व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम शासनाचे नियम पाळून साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला.

तसेच चांदायलेवाडी-चिरनेर येथे *मा. आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना तालुकाप्रमुख संतोषशेठ ठाकूर* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये *वृक्षारोपण कार्यक्रम* संपन्न झाला. यावेळी *उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधवंत साहेब, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे साहेब,* समासेवक रविशेठ पाटील, समाजसेवक राजू मुबंईकर, काशीनाथ खारपाटील, विवेक केणी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post