महापालिका क्षेत्रात बुधवारी महाकोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन : महापौर आणि आयुक्तांची माहिती

 

कोविड या साथरोगाच्या नियंत्रणाकरिता १८ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविड लसीचा डोस घ्यावा.- महापौर दिग्विजय सुर्यवंशी : 


कोविड लसीपासून नागरिक वंचित राहणार नाही: आयुक्त नितीन कापडणीस.






   प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सांगली :  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड लसीकरण मोहिम सुरु असुन बुधवार दिनांक१५ सप्टेंबर २०२१ रोजी महाकोविड लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.  या दिवशी कोविड लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्या व पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देणेकरिता बाहयसंपर्क कोविड लसीकरण सत्राचे नियोजन प्रत्येक प्रभागामध्ये केले आहे.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने शासन निर्देशानुसार दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय संस्था यांचे मार्फत पहिला डोस झालेले २३९६५६ इतके लाभार्थी व दुसरा डोस घेऊन पूर्ण लसीकरण झालेले १०३८८० इतके लाभार्थी आहेत. त्यानुसार पहिल्या डोसचे ५८ टक्के व दुस-या डोसचे २५ टक्के इतके नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. या मोहिमेचा चांगली उपयोग होत असून ज्या नागरिकांचे कोविड लसीचे २ डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना

कोविड साथरोगाचा लागण होण्याचे प्रमाण कमी असून त्यामुळे मृत्युदरही कमी झालेला आहे. तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे कोविड लसीकरण होण्याकरिता बुधवार दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी महाकोविड लसीकरण अभियानांतर्गत बाहयसंपर्क कोविड लसीकरण सत्राचे प्रत्येक प्रभागनिहाय महानगरपालिका मार्फत नियोजन करण्यात आले असून या दिवशी कोविड लसीकरण बुथवर सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.तरी बुधवार दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी महाकोविड लसीकरण अभियानांतर्गत सर्व १८वर्षावरील नागरिकांनी कोविड लसीचा डोस घ्यावा यासाठी महानगरपालिकेमार्फत आवाहनही महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


बाईट: दिग्विजय सुर्यवंशी, महापौर

Post a Comment

Previous Post Next Post