कोल्हापूर जिल्हयातील १४४ बंदी आदेश रद्द. ... जिल्हाधिकारी राहूल रेखावार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : श्रीकांत कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मधील कलम 144 (5) अन्वये दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी पारित केलेला आदेश विखंडित केला आहे.माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या संभाव्य कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावेळी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व सर्वसामान्यांच्या सार्वत्रिक हिताच्या दृष्टीकोनातून दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी 05.00 वा. पासून ते दि. 21 सप्टेंबर 2021 रोजीच्या 24.00 वा. पर्यंत पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये बंदी आदेश निर्गमित करण्यात आला होता.

दि. 20 सप्टेंबर 2021 रोजीचा माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित राजकीय व्यक्तींचा कोल्हापूर दौरा सद्यस्थितीत रद्द झाला असल्यामुळे दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी पारित करण्यात आलेला आदेश विखंडित करण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मधील कलम 144 (5) अन्वये दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी पारित केलेला आदेश विखंडित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post