प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कऱ्हाड - भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली असून यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या एका नव्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.आप्पासाहेब नलावडे यांच्याकडे सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा नवा आरोप सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. तसेच मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची असून या घोटाळ्याबाबत ईडीकडे उद्या कागदपत्रे देणार आहे अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. ते कऱ्हाड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, २०२० मध्ये पारदर्शकपणा शिवाय एका कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. यातील ९८ टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात २ टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या नातलगांचे आहेत.
कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली. ती का दिली ते शरद पवारांना माहिती आहे. मतिन हे हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. तसंच पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले आहेत.