प्रेस मीडिया वृत्तसेवा :
ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स ही कंपनी महिलांना कर्ज पुरवते, पण या मायक्रो फायनान्स कंपनीने आता सावकारी पध्दतीने कर्ज वसूल करत आहे, कर्जदार कोरोना पॉझिटिव्ह असून देखील त्या कर्जदारास पैसे भरा असा तगादा या ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला, ही तक्रार मनसेकडे येताच या कंपनीला चांगलेच धारेवर धरले अशी जर सावकारी पध्दतीने व दमदाटीने कर्ज वसूल केले तर ग्रामीण कुट्टा मायक्रो फायनान्स मनसे स्टाईलने फोडणार असे मनसेचे पदाधिकारी मनसे शहर सचिव महेश शेंडे,वाहतुक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके, उपशहर अध्यक्ष योगेश दाभोळकर, प्रमोद भाटले, कृष्णा कोपार्डे, अतूल मोहिते, मिनाज बागवान असा इशारा दिला.