तारदाळ खोतवाडी येथील ऑगस्ट महिन्याचे पाणीपट्टी मासिक बील होणार माफ...



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकंरजी प्रतिनिधी श्रीकांत कांबळे. 

तारदाळ खोतवाडी येथील ऑगस्ट महिन्यातील पाणीपट्टी माफ होणार  तारदाळ खोतवाडीस भारत निर्माण नळ पाणीपुरवठा संयुक्त योजने मार्फत पाणी पुरवठा केला जातो. जुलै व ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे वारणा नदीस महापूर आल्यामुळे महापुरामध्ये दानोळी येथील जकवेल पूर्णपणे बुडलेले होते त्यामुळे तेथील सर्व विद्युत उपकरणे पाण्यात बुडाल्याने सदर ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महिना लोकांना पाणी देता आले नाही  त्यामुळे लाेकांची गैरसाेय झाली तसेच लॉकडाऊन  मुळे अनेक उधाेग धंदे बंद हाेते त्यामुळे अनेक लाेकांना काम नव्हते.म्हणुन तारदाळ खोतवाडी दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने मासिक सभेत ठराव करून एक महिन्याची पाणीपट्टी माफ करण्याचे ठरले आहे. असे तारदाळचे सरपंच यशवंत वाणी व खोतवाडी चे सरपंच संजय चोपडे यांनी सांगितले. यावेळी तारदाळचे उप सरपंच सुधाकर कदम व ग्रामसेवक बजरंग सूर्यवंशी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post