पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता परवानगी द्यावी , मनसेची प्रांताधिकारी मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी.





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकरंजी शहर विधानसभा वतीने प्रांताधिकारी मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. 

पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता परवानगी द्यावी असे सांगण्यात आले कोरोना पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण या गोष्टीवर पंचगंगा नदी मध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता निर्बंध घालण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले तरीही फेरविचार करावा असे आम्ही त्यांना निवेदन देत असताना सांगितले व सर्व मंडळांना पंचगंगा नदी मध्ये गणेश विसर्जन  करण्यास द्यावे असे आम्ही मनसेच्या वतीने मागणी केली आहे. 

निवेदन देते वेळी मनसेचे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर खूप तालुका अध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे ,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष रणजीत जाधव ,इचलकरंजी शहर सचिव महेश शिंडे, इचलकरंजी शहर सचिव नितीन कटके, वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष विश्वास बचुटे, वाहतुक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके , कोल्हापूर जिल्हा रोजगार स्वयंरोजगार चे प्रसिद्धीप्रमुख  अनिरुद्ध पाटील, मनसे उपतालुका अध्यक्ष दीपक पवार तारदाळ ,खोतवाडी अध्यक्ष बाळासाहेब राजमाने, शहर उपाध्यक्ष योगेश दाभोळकर, शहर उपाध्यक्ष रामचंद्र बागल कोठे ,शहर उपाध्यक्ष अरुण घोलपे शहर उपाध्यक्ष विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष रोहित कोटकर संग्राम कोरे कोरोची उपाध्यक्ष शुभम वाईंगडे मनसे रुई चे अध्यक्ष अमोल झपाटे त्यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.....

Post a Comment

Previous Post Next Post