लेटेस्ट न्युज : 29 सप्टेंबर 2021 रोजी इचलकरंजी शहरामध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम ॲड सौ अलका स्वामी


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की,29 सप्टेंबर 2021 रोजी इचलकरंजी शहरामध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

यूपीएचसी *तांबे माळ* केंद्रा आतर्गत तांबे माळ शाळा, कलानगर शाळा, आण्णा रमगोंडा शाळा,संत गाडगे महाराज विद्या मंदिर, वार्ड नंबर 19 मधील दत्त मंदिर.तसेच यूपीएचसी कलावंत गल्ली केंद्रा आतर्गत अमराई मळा,स्वामी मळा,मथुरा नगर, लाखे नगर, कलावंत गल्ली, वडगांव बाजार त्याच प्रमाणे यूपीएचसी शहापूर केंद्रा आतर्गत आधार लायब्ररी कृष्णा नगर,तोरणा नगर,विठ्ठल नगर, सावली सोसायटी, दत्तनगर या ठिकाणी यूपीएचसी लालनगर केंद्रा आतर्गत लालनगर, आवळे सांस्कृतिक भवन,सुभेदारकाका शाळा, जिम्नॅशियम हॉल मध्ये तर

यूपीएचसी *गावं भाग* केंद्रा आतर्गत बागणी वसाहत, बाबू गेनू विद्यामंदिर, नाकोडा शाळा मनोरंजन मंडळ, चांदणी चौक या  ठिकाणी प्रत्येक 300 डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरातील 18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही त्यांनी वरील केंद्रावर जाऊन कोवीड -19 चा डोस घ्यावा आणि नगरपालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी यांनी केले 


Post a Comment

Previous Post Next Post