प्रेस मीडिया वृत्तसेवा : इचलकरंजी... आनंदा शिंदे...
क्रांतिदिन व स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून संत गाडगे महाराज चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्त दान व आरोग्य शिबीराचा कार्येक्रम संपन्न झाला.कार्यक्रमच्या ठिकाणी गाडगे बाबांच्या फोटोचे पूजन आयजीएमचे डॉ .श्री नितीन भाट यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉक्टर पुढे म्हणाले की संत गाडगे महाराज ट्रस्ट व माझे ट्रस्ट येणार काळात मध्ये आम्ही दोघे मिळून मिसळून सामाजिक काम करुया आपल्या ट्रस्ट ने अशा प्रकारे सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन एक नवी दिशा सर्व समाजाच्या पुढे ट्रस्टच्या संचालक मंडळाने एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. सर्व संचालक मंडळाला मी मना पासून शुभेच्छा देतो आणि या पुढे ट्रस्टला सर्व प्रकारचे मदत करण्याचे आश्वासन देतो एवढेच या कार्यक्रमाचा निमित्ताने मी ग्वाही देतो.
श्री तानाजी पोवार आपले मनोगत मांडताना पुढे म्हणाले.की देशामध्ये महारोगाचे सावट व महामारी संकटकाळात देखील गरीब विद्यार्थी नीला कुमारी सिद्धी विनायक जाधव हिला पुढील शिक्षणासाठी ट्रस्टच अध्यक्ष श्री आनंदा शिंदे व ऑडिटर श्री वासुदेव कोष्टी यांच्या हस्ते पाच हजार चा चेक देताना या मंगल प्रसंगी मला फार आनंद होत आहे.
मी दुसऱ्या ठिकाणी लग्न समारंभासाठी जावे लागल्याने या कार्यक्रमासाठी उशीर झाला बदल मी दिलगीर व्यक्त करतो . परंतु संत गाडगे महाराज चॉरिटेबल ट्रस्टचने कार्य चांगले हाती घेतल्याचे अभिमानास्पद आहे , ट्रस्ट ने अशाच अखंड पणे कार्य सुरू ठेवावे.अशी मी शुभेच्छा देतो..
श्री तानाजी पोवार बरोबर नगर परिषद चे आरोग्य सभापती श्री संजय केगार ,वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष श्री नानासाहेब पारडे. माजी नगरसेवक श्री.श्रीकांत कांबळे. उघोजक श्री विनायक यादव.आणि हातकणंगले तालुका सरचिटणीस (भाजप)श्री उदय सिंह शिंदे हे हजर होते..
ट्रस्ट चे अध्यक्ष श्री आनंदा शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की या ट्रस्ट वतीने आम्ही पाच वर्षां पुर्ण झाले आहेत.आम्ही कार्याबदल२०१९ते २०२१ या दोन वर्षे मध्ये आमच्या ट्रस्ट ला चार पुरस्कार मिळाला बदल आम्हाला फार अभिमान वाटतो.या पुढे ट्रस्टने असेच सामाजिक कार्यक्रम हाती घेतले आहेत.उदा.. जेष्ठ व्रूधाश्रम,गोशाळा संकल्पना आहे .त्यासाठी इचलकरंजी नगरपालिका कडे जागा मागणी साठी दोनदा अर्ज केले आहेत तो विषय अजून प्रलंबित आहेत .या जागे साठी नगरपरिषद नगराध्यक्षांना व उपनगराध्यक्षांना किती वेळ तरी भेट घेतली फक्त आश्वासन मिळाले परंतु काम होताना दिसत नाही .
नगराध्यक्षा सौ.अलंका स्वामी यांनी दैनिक महासत्ता मध्ये जाहीर निवेदन केले होते की. मलकापूर नगरपालिका ने जसे गो शाळा करीता सेवा भावी संस्था ट्रस्ट ना जागा उपलब्ध करून देण्यात आला आहेत त्या धर्तीवर इचलकरंजी नगरी मध्ये राबविण्यात येणार आहे म्हणून तीन सेवा भावी संस्था ने लेखी अर्ज केले आहेत परंतु त्या विचार देखील झाला नाही हे सेवा भावी संस्था चे दुर्देव म्हणावे लागेल.
रक्त दान व आरोग्य शिबीरास तुलसी ब्लड बँक संजय घोडावत ग्रुप जयसिंगपूर आणि केअर हॉस्पिटल कोरोची याचे सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश शिंदे.सुभाष परीट .निवास परीट.राजू शिंदे. गणेश शिंदे. संगम शिंदे. दिगंबर परीट . व्यंकटेश बन्ने. राकेश परीट. प्रमोद परिट. दिलीप शिंदे. पांडुरंग परिट. सातापा परीट प्रविण परिट अरुण परिट. शा संजय जाधव आणि प्रताप शिंदे हारूण यादव यांनी परिश्रम घेतले
शेवटी ट्रस्ट चे सहकारी रमन शिंगाडे यांनी आभारप्रदर्शन केले