प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर, यांच्या वतीने होणाऱ्या इचलकरंजी नगरपालिका निवडणुक लढवण्या करता इचलकरंजी शहरा मधिल सर्व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली,बैठकी मध्ये इचलकरंजी मध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये महाराष्ट्र सैनिकांशी संवादासाठी व प्रत्येक प्रभागांमध्ये बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे , तसेच निवडणूकी करता आठ पदाधिकाऱ्यांची शहर समितीची स्थापना करण्यात आली आहे तसेच प्रभाग समिती सुद्धा करण्यात आली
प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कडे प्रभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे इचलकरंजी नगरपालिका ताकतीने लढवण्याचे ठेवण्यात आले आजच्या मिटिंगला उपजिल्हा अध्यक्ष रवी गोंदकर, इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रतापराव पाटील, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी, कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन मालणकर, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष विनायक मुसळे, रोजगार विभाग जिल्हा संघटक राजेंद्र निकम, उपतालुका अध्यक्ष शाहाजी भोसले,शहर सचिव महेश शेंडे, नितीन कटके, महीला जिल्हा अध्यक्ष सिंधूताई शिंदे,व सर्व उपअध्यक्ष, विभाग अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते*